तरूणांनो संधी साधून घ्या...
हॅलो फ्रेंड्स... आज थोडसं वेगळ्या विषयावर बोलणार आहे. खरतर, आपण प्रत्येक जन मागील काही वर्षांपासून कुठे न कुठे, कधी न कधी ऐकतच आलो आहोत की, “बेरोजगारी खूप वाढत आहे, तरुणांना रोजगार मिळवन्यासाठी खूप त्रास होतोय आणि येणार्या पिढी साठी तर खूप भयानक परिस्थिती असेल आणि आता तर कोरोंनामुळे कित्येक तरुण हताश होवून बसलेत, याच विचारात कि आता आपलं आणि आपल्या कुटुंबाच कसं होणार.” पण मित्रांनो निट विचार केला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्ष्यात येतील कि, ‘काळ बदलला कि संधी बदलते’.
मित्रांनो मला सांगा, जी कामे किंवा जी जीवनशैली आपल्या आजोबांच्या, पनजोबांच्या काळात होती तीच कामे, तीच जीवनशैली आज आहे का...? तर नक्कीच नाही. हा आता, लोकसंख्या वाढल्यामुळे कदाचित प्रत्येकाला चांगली आणि हवी ती नोकरी मिळेल या बाबत शंका आहे, पण नोकरी म्हणजेच संधी हा गैरसमज पहिला मनातून काढून टाका.
मित्रांनो, नोकरी ही गोष्ट जेवढी मागील १०-१२ वर्षापूर्वी चांगली असायची(सुरक्षेच्या दृष्टीने) तशी आता नाहीये. आज परिस्थिती खूप वेगळी आहे. कारण आपन जर मागे वळून पाहिले तर आपल्याला समजून येईल आणि हे खूप महत्वाचे आहे. “मागील २०-२५ वर्षात संपूर्ण जग जेवढे बदलले आहे तेवढे कधीच बदलले नव्हते, तंत्रज्ञानाच्या जोरावर खूप मोठ्या प्रमाणात हा बदल झालेला आहे. आणि त्यामुळेच आज प्रत्येकाला समान संधि आहे फक्त ती ओळखून घेवून कामाला लागा”
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा बिलकुल नाहीये की तुम्ही सगळ्यांनी नोकरी सोडून उदद्योग-धन्दे
करण्याकडे वळावे, पण आजची नेमकी परिस्थिती समजून घ्या. इंटरनेट मुळे सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत. बर्याचशा गोष्टी ऑनलाइन होवू लागल्या आहेत. लोकांना इंटरनेट चे महत्व लवकर समजत नव्हते पण मागील काही वर्षात स्वस्त: दरात ते सहज उपलब्ध झाल्यामुळे इंटरनेट चा वापर मोठ्या प्रमाणात होवू लागला. शिवाय आता करोनामुळे लॉकडाउन च्या काळात तर खूप ऑनलाइन व्यवहार चालू झाले. लोकांना इंटरनेट चे महत्व समजले आहे. त्यामुळे आता स्वतः अपडेट राहणे खूप गरजेचे आहे.
मित्रांनो,तर विषय हाच आहे की, याच गोष्टीकडे आपण संधी म्हणून पाहाला हवे. अशा खूप सार्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही ऑनलाइन करू शकता आणि एक उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होवू शकतो.
आज खूप ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याचा वापर करू शकता.
उदाहरणार्थ; Youtube, Instagram, Online Marketing etc…
शिवाय या लॉकडाउन मुळे ऑनलाइन एड्युकेशन च्या दृष्टीने देखील तुम्हाला मोठी संधी आहे. थोडक्यात काय तर, हताश होवू नका, निराश होवू नका.
आता Hardwork पेक्षा smartwork वर भर देण्याची गरज आहे.
मित्रांनो, योग्य दिशेने प्रामाणिक मेहनत घ्या, यश तुमचंच आहे...
All The Best
धन्यवाद.....

Good one Bro..
ReplyDeleteThanks bhai 😘
Delete